तहसील कार्यालय चिखली

संजय गांधी निराधार अनुदान योजना


पात्रता
1. ६५ वर्षापेक्षा कमी स्त्री / पुरुष
2. १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी
3. कुटूंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न २१,०००/- पर्यंत किंवा दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र
4. अपंग / दिव्यांग करीता वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. ५०,०००/- पर्यंत
5. आर्थिक सहाय्य प्रती लाभार्थी रू.१५००/-
6. अपंग, अंध, दुर्धर आजाराने ग्रस्त जसे कर्करोग, क्षयरोग, एचआयव्ही ग्रस्त, निराधार, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या, देवदासी, अत्याचारीत महिला, तृतीयपंथी, अनाथ मुले (१८ वर्षाखालील), ३५ वर्षावरील अविवाहीत महिला, सिकलसेलग्रस्त, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या व्यक्तीची पत्नी, आत्महत्या केलेल्या शेतकन्याची पत्नी इत्यादी
• आर्थिक सहाय्य रु.१५००/-
आवश्यक कागदपत्रे
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. वयाचा दाखला
3. रहिवासी दाखला
4. बँकेचे पासबुकची झेरॉक्स प्रत
5. रेशनकार्डची प्रत
6. अशिक्षित असल्यास वैद्यकिय अधिक्षकाचे वयाचे प्रमाणपत्र / मोठ्या मुलाचे / मुलीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्माचा दाखला
7. विधवा असल्यास पतीचा मृत्यू प्रमाणपत्र
8. जातीचा दाखला
9. उत्पन्न किंवा बी.पी.एल. प्रमाणपत्र
10. आधारकार्डची प्रत
11. निवडणूक ओळखपत्र

It appears you don't have a PDF plugin for this browser. No biggie... you can click here to download the PDF file.